आजकाल फारच तुरळ पणे दिसणारे Reynolds pen हे आपल्या शाळकरी जीवनातील आठवणींचा भाग आहेत.
आज बाजारातुन हे मॅाडेल गायब झाल्यासारखेच वाटते.
तसे नसले तरी फारच तुरळ पणे Reynolds pen पहायला मिळतो.
Reynolds India ही Newell या अमेरीकन कंपनीची subsidiary company.
Reynolds ब्रॅंड जगभर प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी भारतीय बाजारात ८० च्या दशकात GM pen International या चैन्नई base कंपनीच्या मार्फत प्रवेश केला.
GM pen कंपनीने त्या वेळी सचिन तेंडुलकरला Reynolds च्या जाहिरातीसाठी वापरले होते. एकुनच ८० च्या उत्तरार्धात व नव्वदिच्या दशकात विद्यार्थ्यांच्याच नाही तर सर्वांच्याच जीवनातील Reynolds pan महत्वाचा भाग बनलेला होता.
Reynolds वर 045 असा नंबर लिहीलेला आठवत असेल, १९४५ साली Reynolds हा ब्रॅंड established झाला होता म्हणुन 045 असे लिहीले असायचे.
अजुन एक छोटीशी आठवण म्हणजे पेनवरील spelling ची खाडाखोड करुन “India” तयार करायचो आपण….
बर्ययचदा बाजारात नकली Reynolds pen सुध्दा मिळायचे.
GM pen कडे या पेनाचे उत्तपादनाचे व विक्री चे अधीकार दिले होते मात्र Technology transfer केले नव्हती त्यामुळे त्या design मधे बदल वगैरे करण्याची मुभा त्यांना नव्हती. तसेच SAARC देशांच्या व्यतिरिक्त इतरत्र Export कारण्यास ही GM pen ला परवानगी नव्हती. त्यामुळे नंतर च्या काळात स्पर्धे टिकुन राहण्यासाठी 2016 GM pen ने आपले नविन उत्पादन Rorito या नावाने आणले व Reynolds बरोबरचा आपला दोन दशकांपेक्षा जास्तीचा करार रद्द केला आणि मग हा पेन हळुहळु दिसेनासा होऊ लागला.
GM pen ने १९९५ लाच Rorito Pen ही नवी subsidiary चालु केली होती. GM pen चा जबरदस्त मार्केट Share पाहता Reynolds ने GM pen बरोबर आपली भागीदारी चालु ठेवण्याची तयारी दाखवली होती मात्र GM pen ला आता केवळ स्वताःहाच्या Rorito pen वरच लक्ष केंद्रीत करायचे होते.
त्याकाळात Reynolds चे २८ लाख नग प्रती दिवस एव्हढी विक्री होती. GM pen ने लवकरच तो आकडे पार करुन त्याच्या स्वतःहाच्या Rerito ची विक्री ३८ लाखा पर्यंत पोहचवली. त्याच बरोबर त्यांनी इतरही उत्पादनाची सुरुवात करुन ITC सारख्या कंपनीला स्पर्धा निर्माण केली.
२०१६ ला GM pen बरोबरचा करार रद्द झाल्याने Reynolds ने Flair बरोबर करार केला व त्यांच्या मार्फत marketing व distribution चालु ठेवली आहे. मात्र flair मार्केट शेरच कमी असल्याने व स्पर्धेत इतर बरेच ब्रॅंड मॅाडेलस मार्केट मधे उपलब्ध असल्याने कदाचीत Reynolds pen दुर्मिळ पणेच दिसतात.
काल Amazon वर order केले आहेत मी Reynolds चे एक पॅकेट.