spot_img
Homeभटकंतीसाऊथ इंडियन फिल्टर कॅाफी

साऊथ इंडियन फिल्टर कॅाफी

परवाच्या चैन्नई ट्रीपच्या शेवटच्या दिवशी सकाळी कॅाफी पिताना अचानक आठवले की आरे हे राहीलेच की.
मग मित्राची वाट बघत बघत टेबलवरच लिहायला सुरुवात केली.
मात्र तीअर्धवट राहीलेली पोस्ट काल रात्री पुर्ण केली.
जी दिवसाची सुरुवात करताना हवीच असते शिवाय संध्याकाळी ४ वाजता न सांगता टेबलवर येते ती फिल्टर कॅाफी,
कोणी साऊथ इंडियन फिल्टर कॅाफी म्हणतात, कोणी मद्रास कॅाफी तर कोणी कुंबकोनम डिगर्री कॅाफी.
केवळ पुण्या मधे राहुन किंवा जन्म घेऊन कोणी पुणेकर होत नाही. पुण्याचा sarcasm जोवर तुमच्या नुसत्या स्वभावात नाही तर रक्तात मिसळला जात नाही तोवर पुणेकरत्व प्राप्त हात नाही. सुरुवातीला समोरच्याला तो खडुसपणा, उर्मठपणा वाटतो पण हळुहळु त्यातील गंमत, त्यातली कल्पकता लक्षात आली की मग त्यामधील आनंदही घेता येतो.
तसेच आहे या साऊथ इंडियन फिल्टर कॅाफीचे. ज्या विशिष्ट पध्दतीने ती बनली जाते त्यामुळे एक काहीसा कडवटपणा त्यात असतोच. सुरुवाती-सुरुवातीला जरा चवीला जास्तच कडवट जानवतो पण हळुहळु त्याच चवीमुळे या साऊथ इंडियन फिल्टर कॅाफीची तलफ लागते. आणि जो पर्यंत तुम्हला या साऊथ इंडियन फिल्टर कॅाफीची अशी तलफ लागत नाही तोवर तुम्हाला चैन्नईकरत्व प्राप्त होऊच शकत नाही.
फिल्टर कॅाफी म्हणजे घरगुती/ देशी Espresso coffee च एक प्रकारची. Starburst, Barista, CCD वगैरे प्रकारच्या Branded Espresso coffee outlet पेक्षा
ही साऊथ इंडियन फिल्टर कॅाफी कधीही भारीच वाटते, हे आता एव्हान वेगळे सांगायची गरज नाही. कोणतेही variation नसते. जगात कोठेही बनवा, एकच वैश्विक पध्दत. त्यामुळे चवीत फारसा फरक पडत नाही. शिवाय serve करण्याची एकच युनिव्हरसल पध्दत आहे. एकाच विशिष्ट साईजच्या स्टीलच्या किंवा पितळेच्या ग्लास व वाटी मधेच ती serve केली जाते.
आपल्याकडे कपातला चहा बशीत ओतुन प्यायचा म्हणजे स्टेट्स मॅनर्स वगैरे आडवे येते. फिल्टर कॅाफीचे तसे नाही ती ग्लासातली वाटीत ओतुनच प्यायची असते तरच मग पोहचते अगदी घशातुन आत्म्या पर्यंत. (पत्रकार विनोद दुवा यांची ही उपमा)
फार टेक्निकल मधे न जाता सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या घरगुती फिल्टर मधे chicory Coffee मिक्स पावडर भरुन त्यात गरम पाणी टाकुन त्याचा अर्क (decoction) त्याच फिल्टर च्या खालच्या बाजूच्या कंटेनर मधे जमा केला जातो. हा साधारण पणे वीस एक मिनीटांचा कार्यक्रम आहे. मग त्या जमा झालेल्या अर्कात आधी हवी तेव्हढीच साखर मिसळुन तो अर्क १ः३ या प्रमाणात गरम गरम दुधा बरोबर खाली-वर करत मिक्स करताना त्यात जास्तीत जास्त हवा मिसळली गेली पाहीजे, की तयार होते ती फेसाळलेली साऊथ इंडियन फिल्टर कॅाफी.
Espresso machine मधे hot steam nozzle ने असे फेसाळलले दुध करुन कॅाफीवर कलाक्रुती कली जाते, आणि त्याचेच आपण २००, ३०० रुपये एका कपाचे देतो.
फिल्टर कॅाफी बनवण्याची वर सांगीतलेली पध्दत तशी सोपी असली तरी यात हात साफ झाल्याशिवाय हवा तो कॅाफीचा वातावरण निर्माण करणारा सुगंध/ aroma निर्माण होत नाही. जेव्हढा आनंद कॅाफी पिण्याचा तेव्हढाच तो aroma अनुभवण्यात आहे…
इकडे पुण्याला घरी बनवण्याचा सुध्दा प्रयत्न करत असतो मी कधी मधी आठवण झाली की.
जमतय हळुहळु…..

- Advertisement -

spot_img