बाळासाहेबांनच्या निधनांनतर एका मुलाखतीत मंगेश तेंडुलकरांनी बाळासाहेब एक राजकारणी व एक व्यंगचित्रकार यात काय साम्य जाणवते हे अगदी मार्मिक पध्दतीने वर्णन केले होते.
तेंडुलकर म्हणतात. “घार जशी जमिनीवरील लक्ष टिपण्या पुर्वी आकाशात घिरट्या मारत राहते ती त्या लक्षाचा पुर्ण आदांज येई तोपर्यंत, आणि मग क्षणात विजेच्या वेगाने काही कळायच्या आत त्याचा कब्जा मिळवते तशाच प्रकारे बाळा साहेंबाचा हात ब्रश घेऊन पेपरवर स्ट्रोक मारण्यापुर्वि घिरट्या घेत असे आणि एकदा का ठरले, पक्के झाले की मग क्षणार्धात स्ट्रोक पेपरवर पडत, त्यात परत दुरुस्तीचा विचार पण नाही.
तेच त्यांच्या राजकीय जीवनात आपल्याला दिसते. एखाद्या राजकीय विषयावर घिरट्या घेत एकदा का भुमिका घेतली की परत त्या भुमिके पासुन माघार वा त्या विषयाला बगल देण्याचा आटापिटा कधीच नाही.
माझ्या भुमिकेला चुकिच्या पध्दतीने दाखवले गेले वगैरे आशी सारवासारव नाही.”
राजकारण्याच्या काही मर्यादा लक्षात घेतल्या तर आपल्यालाही काही गोष्टींवरुन ते लक्षात येते की काही भुमीका ह्या मतांच्या गोळाबेरजेच्या पलिकडे जाऊन त्यांनी घेलेल्या.
मग आणिबाणाला समर्थन आसेल, बाबरी विवाद आसेल, मराठी माणुस, गुजरात्यांच्या आरेरावी संदर्भातील भुमीका, नंतरच्या काळात दक्षिण भारतीयां विरुध्द आंदोलनआसेल, हिंदुत्व आसेल, २००२ च्या दंगलीत मोदींचे सर्मथन आसेल, स्वत: निवडणुन न लढवण्याचा विषय आसेल. इतरही विषय असतील.जे ते छाती ठोकपणे.
भुमिका चुक बरोबर ज्या काही आसतील परंतु ज्या भुमिका घेतल्या त्या ठाम होत्या, शेवट पर्यंत..