spot_img
Homeकविताकोण नामदेव ढसाळ,

कोण नामदेव ढसाळ,

काही माणसे असतात चारित्र्यवान
काही माणसे असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही.
ग्रीष्मातही झाडे जाळायची राहत नाही.
कोण नामदेव ढसाळ? असे विचारले कोणी.
म्हणून विद्रोहाचा हा सूर्य काही झाकला जायचा नाही.

तरी सांगतो, कोण आहे हा नामदेव ढसाळ.
प्रस्थापितांच्या साहित्याचे ज्याने फाडले होते आभाळ.
मुंबईच्या गल्लीतून तो निघाला,
दलितांच्या वेदनेला शब्द देऊ लागला.
पांढरपेशी चौकटी मोडून टाकू लागला
त्याने कामाठीपुरा’, संत फॉकलंड रोड अजरामर केला.

पँथरच्या माध्यमातून शोषक व्यवस्थेचे रंगवले होते थोबाड.
देवळातल्या आपल्या देवाचा निर्माता त्याने सांगितला वडार.
त्याने लिहिलेल्या शब्दांना कविता वगैरे म्हणतो आपण.
त्याचे गोलपिठा सारखे लिखाण म्हणजे व्यवस्थेला दर्पण.

अश्लील, घाणेरडे वाटत असेल कोणाला त्याचे लिखाण.
रंजल्या गांजल्याचे वास्तव होते आणि भावनांनचे तुफान.
अन्यायाच्या भितींना हादरवणारे होते त्याचे स्फोटक अर्थ.
वास्तवाशी भिडणारे असे मांडण्याचा दिसतो एकच मूलमंत्र.

सत्ता, धर्म, व्यवस्थेच्या कचाट्यातून
तो बंद पुकारत गेला निर्भीडपणे.
नामदेव ढसाळ फक्त कवी नव्हता.
तो होता चळवळीचा प्रखर वणवा.

- Advertisement -

spot_img