इलेक्शन आल की खेळाडू सगळेच असतात तयार.
मिळेल त्या टिम मधुन खेळण्यासाठी इथे सगळ्यांची मारामार.
राजकीय पक्ष इथं आयपीएल स्टाईल खेळात,
कमी पडला खेळाडू की दुसर्या टिम मधुन आणतात.
इथे खेळाडु मात्र एक पाऊल टिमच्या हि पुढेच असतात.
एकासाठी बॅटींग करता करता दुसर्याची हि फिल्डींग लावतात.
बॅटींग आपल्याला च मिळावी म्हणुन सगळेच गोड गोड बोलतात.
जनतेने ही आपल्याच कॅच पकडावा म्हणुन जाम उंच उंच फेकतात.
आता तर दोन आणखी नविन टिम आल्यात मैदानात दंड ठोकून,
बॅट आणि बॅाल सुध्दा म्हणे आणलेत त्यांनी दुसर्याचेच ढापुन.
दोन टिमा इथे मैदानात एकमेका विरुद्ध लढतात.
पण विकेट कोणाची काढायची ते मैदाना बाहेरचे लोक ठरवतात.
आयपीएलसारखं इथंही आहे मॅच फिक्सिंगचा खेळ,
लबाड राजकारणी मात्र जनतेला लागुच देत नाहीत मेळ.
फायन नंतरही इकडे असते प्लेअरच्या अदलाबदलीची सोय.
लोकांनाही मग पडतो प्रश्न, आपण यालाच निवडल होत होय?
शेवटी काय, इथेही आपलाच स्कोअर वाढवायचा असतो प्रत्येकाला.
ड्रीम इलेवन च्या मायाजालात अडकून राहतो मतदार राजाही बिचारा.