spot_img
Homeकवितासाखर चपाती

साखर चपाती

गरम गरम करावी चपाती तव्यावर.
त्यावर जाडसर साजुक तुपाची लेअर.
आता मग भुरभुरावी जराशी साखर.
रोल रोल करुन, ताव मारावा त्यावर.

सकाळी तर व्हायचाच नाष्टा पोटभर.
गरज डब्याची ही भागायची वेळेवर.
कॅलरीज वगैरेचे ओझे नसायचे मनावर.
क्वचीतच भरायचे मन आमचे एकावर.

काहींची हौस होती तर काहींचा आधार.
कोरड्या चपातीलाही चव यायची फार.
या रोल पुढे पाणी कम चाय वटतात,
आजकालचे हे पिझ्झा आणि बर्गर.

- Advertisement -

spot_img
Previous article
Next article