spot_img
Homeकवितामुंगीच वारुळ

मुंगीच वारुळ

कणकण जमऊन बाधंले आहे मुंगीने माडी सारखे घरटे,
मातीची पारख आणि जमिनीची ओळख तीला माणसापेक्षा जास्तच असते.

काय आहे तिच्याकडे? ना विट, वाळु ना सिमेंट,
पण कस उभारलय बघा वारुळ, कमालच आहे तिच टॅलेंट.

केव्हढ ते शरीर तिच आणि काय ती तिची गती,
सातत्य आणि संघर्ष आहे त्यात, नाहीतर ती नुसतीच माती.

आपण माणसा प्रमाणेच समुहाने राहणारा हा जीव,
तिची जिद्द व शिस्त पाहुन आपल्यालाच आपली का नाही वाटावी किव?

संघटीतपणे करते काम, नाही कसला मानपान की नाही कसला अहंकार,
त्याग आणि समर्णाणाशिवाय का उभा राहतो हा असला चमत्कार.

जेव्हढ हे वारुळ जमिनीच्या वर दिसत, ते म्हणे तेव्हढच खोल जमीनीत असते,
मेहनतीच असच असत, बर्याचदा झाकुन राहते, किमंत फक्त वरल्या रंगा रुपाची होते.

- Advertisement -

spot_img

NCC आणि मी

दप्तर.

स्ट्रोक.