सकाळच्या त्या गोड क्षणी,
फिल्टर कॉफीची ओढ जुनी.
वाफाळता प्याला घेता हाती,
जुन्या शब्दांना सुर नवे गवसती.
कॉफीच्या त्या जादुई वासाने,
दुर होती मनाचे सर्व ताण तिढे.
नाजूक फुलांचा सुगंध जनु दरवळे,
मिटल्या डोळ्यांना दिसे स्वच्छ आभाळ निळे.
आठवणींना उजाळा, नव्या स्वप्नांना रंग,
प्रत्येक घोटात मिळे जीवनाचा खरा आनंद.
तृप्तीचा तो प्याला नाही फक्त कॉफीने भरला,
सकाळच्या क्षणी आनंदाचा सागर बरसला.