spot_img
Homeकविताधर्म आड येत नाही.

धर्म आड येत नाही.

माझ्याच धर्माचा म्हणुन कोणी शेताचा बांध वितभर इकडे तिकडे होऊ देत नाही.
पण तोच व्यक्ती माणुसकी म्हणुन एक वेळ आपल्या शेतातून पायवाट सोडतो सगळ्यांसाठी.
इथं धर्मच काम नाही धर्माचा काही संबंध ही येत नाही.

आपल्या धर्माचा म्हणुन कोणी कोणाला रक्तदान करत नाहीं. रक्तपेढ्या पण अजुन तरी धर्माच्या नावावर नाहीत.
रक्तदान करणारा केवळ माणुसकी म्हणुन रक्तदान करतो.
तेथ धर्माच काम नाही, धर्माचा काही संबंधही येत नाही.

धर्माचा म्हणुन कोणी रोटी बेटीचा व्यवहार करत नाही तेथे ही कुळाचा व जातीचा दाखला लागतो.
माणुसकीच्या ओलाव्यात जर प्रेम खुललेतर अतंरधर्मीय विवाह ही केले जातात.
धर्म इथे ही मागे पडल्या सारखाच जाणवतो.

धर्माचा म्हणुन कोणी बस मधे बसायला जागा देत नाही. माणुसकी म्हणुन फारतर वयस्कर व्यक्तीचा विचार करतो.
येथेही धर्म आठवत नाही त्यांचा संबंधच येत नाही.

भिकारी दान घेताना देणार्याचा धर्म पाहत नाही. तो माणुसकिने देत असतो एव्हढाच त्यांचा विश्वास असतो.
देणार्याला व घेणार्याला येथेही धर्म आठवत नाही त्यांचा काही संबंध येत नाही.

सीमेवर लढणारा हा देशाचा शत्रू असतो. युध्दकैद्यालाही न्यायीक व कायदेशीर अधिकार दिला जातो तो माणुसकिच्या धर्तीवर.
धर्म येथेही आडवा येत नाही त्यांचा काही संबध च नाही.

रोगी कधी डॅाक्टरचा धर्म बघुन शस्त्रक्रिया करुन घेत नाही. डॅाक्टर ही माणुसकीचा व आपल्या ज्ञानाचा वापर रोग्याचा धर्म बघुन करत नाही.
धर्म इथे ही कोणाला आठवत नाही त्यांचा काही संबधच येत नाही.

चोर चोरी करताना धर्म बघत नाही.
एकद वेळेला जास्त धन सापडले तर देव पावला हिच त्यांची भावना असते.
तर चोर पकडला गेला तर धर्माचा म्हणुन कोणी सोडुन देत नाही.
धर्म इथे ही कोणाला आठवत नाही त्याच काही संबधच येत नाही.

बाळाच गोंडसपण सुध्दा धर्म बघत नाही. याधर्माच कमी आणि त्या धर्मात जास्त गोंडस बाळ असतं का कधी.
धर्म इथेही आठवत नाही त्याचा काही संबंध येत नाही.

निसर्गाचा कोप, भुकंप, पुर, दुष्काळ आणि महामारी ही धर्म पाहुन येत नाही.
आलेल्या संकटावर केवळ माणुसकी म्हणुन मदत कार्य केले जाते.
सांगावे कोणी जर त्याने केवळ विशिष्ट धर्माच्याच लोकांसाठी काम केले असेल तर.
धर्म इथे ही आठवत नाही त्याच्या पलिकडे माणुसकी आठवते अशा वेळी.

कमाल आहे जगण्यात कोठेच धर्माची गरज पडत नाही आणि , मग धर्म आहे तरी काय? आणि तो नक्की सांगतो तरी काय?

धर्म हा प्रत्येक व्यक्तीने व्यक्तिगत जीवनात स्वतःहा कसे रहायचे, वागायचे, जगायचे हे शिकवतो.
तु दुसर्याला खर बोलायला लाव. तु दुसर्याला पुजा करायला लाव.तु दुसर्याला दारु पिऊ देऊ नको.
असे उपदेश कोणत्याही धर्मात नाहीत.

त्यामुळे धर्म हा व्यक्तिगत विषय आहे. ज्याची जेव्हढी आणि जशी कुवत त्याला धर्म तसा तेव्हढाच समजला.
मला समजला तसाच तुला समजला पाहीजे हा आग्रह कोणत्या हि धर्मात नाही.

- Advertisement -

spot_img